द बर्निग कारचा थरार; गेवराईत भरधाव कारने अचानक पेट घेतला, चालक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:10 IST2023-02-25T14:10:13+5:302023-02-25T14:10:35+5:30
नाशिककडे जात असताना गेवराई बायपासवर कारने अचानक पेट घेतला.

द बर्निग कारचा थरार; गेवराईत भरधाव कारने अचानक पेट घेतला, चालक बचावला
गेवराई : बीडहून नाशिककडे जाणाऱ्या एका कारने गेवराई बायपासवर शुक्रवारी मध्यरात्री पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालक बाहेर पडल्याने अनर्थ टळला. विलास रामदास लांडगे ( रा. सहारा काॅलनी, नाशिक) असे चालकाचे आहे.
विलास रामदास लांडगे हा चालक कारने ( क्रमांक एम.एच १५ एफ.ई ५५८३ ) बीड येथे भाडे घेऊन आला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास गेवराई मार्गे नाशिककडे जात असताना बायपासवर कारने अचानक पेट घेतला. चालक विलास लांडगे हा वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र यात कार जळून खाक झाली. माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर यांनी घटनेचा पंचनामा केला.