'पुढचा जन्म पुरुषाचा नको'; व्हिडीओतून व्यथा मांडत पत्नीपीडित तरुणाने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 11:56 IST2022-08-23T11:56:12+5:302022-08-23T11:56:52+5:30

बीड जिल्ह्यातील घटना, पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

'The next birth is not want male'; The young man who suffered from his wife ended his life expressing his pain through the video | 'पुढचा जन्म पुरुषाचा नको'; व्हिडीओतून व्यथा मांडत पत्नीपीडित तरुणाने संपविले जीवन

'पुढचा जन्म पुरुषाचा नको'; व्हिडीओतून व्यथा मांडत पत्नीपीडित तरुणाने संपविले जीवन

माजलगाव (जि. बीड) : पत्नीच्या जाचास कंटाळलेल्या पतीने पुढचा जन्म पुरुषाचा नको.... असा व्हिडिओ बनवून मरण कवटाळले. ही खळबळजनक घटना १९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे घडली. मयत तरुण जालना जिल्ह्यातील असून पत्नीविरोधात शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार आकाश सुरेश मुळे (२५, रा. बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना, ह.मु. फुले पिंपळगाव, ता. माजलगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो फुले पिंपळगाव शिवारात पालात कुटुंबासह राहत होता. पत्नीचे व त्याचे पटत नव्हते. तिचे परपुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय होता. ‘परमेश्वराकडे जाऊन मी त्याला मागणी मागेल करेन की पुन्हा पुरुषाचा जन्म देऊ नको, घरातील सगळे चांगले आहेत. मात्र, माझी पत्नी जिच्यावर मी खूप प्रेम केलं, तिचं प्रेम दुसऱ्यावर आहे, म्हणून मी स्वत:ला संपवत आहे,’ असा व्हिडिओ तयार करून त्याने १९ ऑगस्ट रोजी जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या दरवाजा क्र. १० ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून हा प्रकार उजेडात आला. याबाबत २१ रोजी शहर पोलीस ठाण्यात मयताचे वडील सुरेश मुळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी मंदा आकाश मुळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Web Title: 'The next birth is not want male'; The young man who suffered from his wife ended his life expressing his pain through the video