तहसीलच्या कोतवालाने महिलेची काढली छेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST2021-03-26T04:34:09+5:302021-03-26T04:34:09+5:30

माजलगाव : येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका कोतवालाने कार्यालयातच एका महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याची घटना ९ मार्चरोजी घडली. दरम्यान, ...

Tehsil Kotwala molested a woman | तहसीलच्या कोतवालाने महिलेची काढली छेड

तहसीलच्या कोतवालाने महिलेची काढली छेड

माजलगाव

: येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका कोतवालाने कार्यालयातच एका महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याची घटना ९ मार्चरोजी घडली. दरम्यान, पीडित महिलेने २५ मार्चरोजी कोतवालाविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित महिला व खरात आडगाव येथील कोतवाल कुंडलिक लिंबाजी आढाव हे माजलगाव तहसील येथे कार्यरत आहेत. ९ मार्चरोजी पीडित महिला कार्यालयात कार्यालयीन काम करत असताना, कोतवाल कुंडलिक आढाव याने अश्लील भाषेत शेरेबाजी करत तिची छेड काढली. दरम्यान, पीडित महिलेने २५ मार्चरोजी प्रत्यक्ष हजर होत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कुंडलिक लिंबाजी आढाव (कोतवाल) याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पो. नि. धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड करत आहेत.

Web Title: Tehsil Kotwala molested a woman