वाल्मीक कराडची 'कॉल रेकॉर्डिंग' व्हायरल करणारा मकोकातील सनी आठवलेला पुण्यात बेड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:01 IST2026-01-24T15:00:23+5:302026-01-24T15:01:10+5:30

एलसीबीची धडाकेबाज कारवाई; वर्षभरापासून गुंगारा देणारा 'आठवले गँग'चा गुंड अखेर गजाआड

Sunny Athawale from MCOCA, who went viral with Valmik Karad's 'call recording', arrested in Pune! | वाल्मीक कराडची 'कॉल रेकॉर्डिंग' व्हायरल करणारा मकोकातील सनी आठवलेला पुण्यात बेड्या!

वाल्मीक कराडची 'कॉल रेकॉर्डिंग' व्हायरल करणारा मकोकातील सनी आठवलेला पुण्यात बेड्या!

बीड : बीडमधील पोलिस अधिकारी आणि वाल्मीक कराड यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करून खळबळ उडवून देणारा 'मकोका'मधील फरार आरोपी सनी शामराव आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या सनीला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे.

१३ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील पेठ बीड भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर 'आठवले गँग'वर मकोका लावला होता. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगण्यासारखे तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या अक्षय आठवले याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र सनी आठवले आपले अस्तित्व लपवून फरार होता. पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, मनोज परजणे आणि विकी सुरवसे यांच्या पथकाने पुण्यात सापळा रचून सनीला ताब्यात घेतले. वर्षभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सनीच्या अटकेमुळे 'आठवले गँग'ला मोठा धक्का बसला आहे.

ऑडिओ क्लिपमुळे आले होते चर्चेत
सनी आठवले हा केवळ गुन्हेगारीमुळेच नाही, तर पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे राज्यभर चर्चेत आला होता. या क्लिपमुळे पोलिस दलाची मोठी नाचक्की झाली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेला तो पुण्यात असल्याची पक्की माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून बेड्या ठोकल्या.

कायम कंबरेला गावठी कट्टा
सनी आठवले हा कायम कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असतो. त्याच्याविराेधात शिवाजीनगर, पेठबीड, केज आणि बीड शहर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेकदा गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Web Title : ऑडियो लीक करने वाला मकोका आरोपी पुणे में गिरफ्तार।

Web Summary : ऑडियो क्लिप वायरल करने के मामले में मकोका के तहत वांछित सनी आठवले को पुणे में एक साल बाद गिरफ्तार किया गया। उस पर हत्या के प्रयास और जबरन वसूली सहित 19 आरोप हैं। गिरफ्तारी आठवले गिरोह के लिए एक बड़ा झटका है।

Web Title : MCOCA accused who leaked audio clip arrested in Pune.

Web Summary : Sunny Athawale, wanted in a MCOCA case for circulating an audio clip, was arrested in Pune after a year on the run. He faces 19 charges, including attempted murder and extortion. The arrest is a major blow to the Athawale gang.