शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:26 IST

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली. आतापर्यंत मराठवाड्यात एकाही उपजिल्हा रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयाने एक पाऊल पुढे टाकत पहिल्यांदा अशी शस्त्रक्रिया करुन विक्रम आपल्या नावी केला आहे.राधिका (वय ३७ रा.केज, नाव बदलले) असे शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव आहे. राधिका यांच्या गर्भाशयातील आतील बाजू चिकटलेली (अ‍ॅशेरमन्स सिंन्ड्रोम) होती. त्यांना यामुळे मोठा त्रास होत होता. शस्त्रक्रियेशिवाय त्यांना पर्याय नव्हता. केज रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून त्यांची शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी परवानगी देण्यासह स्वता: ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना मदत केली.विशेष म्हणजे कमी जखम आणि कमी त्रास व्हावा, यासाठी दुर्बिनीतून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. यासाठी नेहमीपेक्षा केवळ २५ टक्केच रक्तस्त्राव होतो. तसेच आठवडाभर रुग्णालयात राहण्याची गरज नाही. तिसऱ्या दिवशी रूग्णाला घरी पाठविले जात असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह डॉ. स्वप्नील ढाकणे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. बालासाहेब सोळंके, डॉ.दिगांबर मुंडे, परिचारीका ज्योती अरकडे, अंबाड, सेवक नासेर, राऊत यांनी सहाय्य केले.खाजगी रुग्णालयामध्ये ५० हजार रुपये खर्चबीड जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली आहे. यासाठी खाजगी रुग्णालयात ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयातच सर्व तंत्र, यंत्र उपलब्ध करुन या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने सामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.

टॅग्स :scienceविज्ञानMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर