शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन सांभाळून यशस्वी केल्या ३५७७ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:47 IST

केवळ प्रशासन सांभाळणेच नव्हे तर कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावणे आणि स्वता: पुढे होऊन शस्त्रक्रिया करण्यात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आघाडीवर राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केवळ प्रशासन सांभाळणेच नव्हे तर कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावणे आणि स्वता: पुढे होऊन शस्त्रक्रिया करण्यात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आघाडीवर राहिले आहेत. दोन वर्षात स्वत: पुढे होऊन त्यांनी तब्बल ३ हजार ५७७ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुर्बिनद्वारे बिनटाका कुटूंबकल्याणच्या २९२० शस्त्रक्रियांचा समावेश आहे.डॉ.अशोक थोरात हे आगोदर केज उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ७ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुरूवातीला त्यांच्यावर अनेक आरोप झाले. मात्र, हे आरोप झुगारून त्यांनी कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावण्याबरोबरच प्रशासन गतीमान केले.तसेच स्वत: पुढे होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालयात जावून शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. ते स्वता: पुढे झाल्याने कामचुकार करणारे डॉक्टरही शस्त्रक्रिया करण्यासह रूग्णांची वेळेवर तपासणी करू लागले.दरम्यान, ७ आॅगस्ट २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत त्यांनी ३ हजार ५७७ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुर्बिणीद्वारे बिनटाका शस्त्रक्रिया २९२०, टाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ७८, वैद्यकीय गर्भपात २९, सीझर २४३, स्त्रीरोगा संदर्भातील विविध शस्त्रक्रिया १३७, जनरल शस्त्रक्रिया १७० यांचा समावेश आहे. हे सर्व करताना त्यांना भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, परिचारिका व सेवकांची मदत असते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.स्वत: पुढे होऊन काम करण्याबरोबरच लोकसहभागातून तब्बल ८० लाख रूपयांचा निधी जमा केला. या निधीच्या माध्यमातून जिल्हा रूग्णालयात विविधा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मोतिबिंदू, कुटूंबकल्याण, सुरक्षित मातृत्व अभियान आदींमध्ये बीड जिल्हा राज्यात अव्वल आहे. लोकसहभागातून कमी कालावधीत एवढा मोठा निधी जमा करणारे बीड आरोग्य विभाग पहिला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीय