शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहरातील विद्यार्थ्यांनाही मिळणार डाळीसह कडधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST

लोेकमत इम्पॅक्ट अनिल भंडारी बीड : शालेय पोषण आहारांतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह असलेल्या बीड शहरातील ७६ शाळांमधील १८ हजार विद्यार्थ्यांना ...

लोेकमत इम्पॅक्ट

अनिल भंडारी

बीड : शालेय पोषण आहारांतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह असलेल्या बीड शहरातील ७६ शाळांमधील १८ हजार विद्यार्थ्यांना आता तांदळासोबतच एक कडधान्य व एक डाळ प्रमाणानुसार वाटप करण्यात येणार आहे. मात्र, या संदर्भात ५ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असताना, ८ मार्चपर्यंत ठोस हालचाली झालेल्या नव्हत्या. ‘लोकमत’ने ग्रामीण, शहरी भेदभाव कशाला, असा प्रश्न मांडत शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कडधान्य, डाळीचे वाटप व्हावे, अशी पालकांची बाजू मांडत वृत्त दिले होते. १ मार्च रोजी राज्याच्या शालेय पोषण आहार योजना विभागाने केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना धान्य वितरणाबाबत निर्देश दिले आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार धान्यवाटप करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझुमर्स फेडरेशनची निवड करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ फेब्रुवारी, २१ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने पुरवठादाराकडे मागणी नोंदवून विशिष्ट कालमर्यादेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहे.

सेंट्रल किचनशेडमुळे बीड शहरातील ७६ शाळांच्या विद्यार्थ्यांना केवळ तांदूळच वितरित होता. या संदर्भात पालकांनी तक्रारी केल्या होत्या, तसेच शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर शासनाने दखल घेत, संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळवाटपाचे निर्देश दिले. २० दिवसांच्या आत हे हे धान्य थेट शाळांपर्यंत वितरणाच्या सूचना आहेत. कार्यदिनाच्या वेळेत धान्यवाटप न झाल्यास पुरवठादारावर दंडात्मक कारवाईचे निर्देश आहेत.

--------

सेंट्रल किचनशेड अंतर्गत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शासन निर्देशानुसार, तांदळाचे टप्प्याटप्प्याने आतापर्यंत वाटप केले आहे, सुरू आहे. आता डाळ व कडधान्याचे वाटप होणार आहे. काय वाटप होणार, हे अद्याप ठरलेले नाही.

- अजय बहीर, अधीक्षक शालेय पोषण आहार याेजना बीड

--------------------

कडधान्य व डाळीची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश असून, ३ मार्च राेजी बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांची आवड, डाळी व कडधान्यामधील पोषण तत्त्वे या बाबी विचारात घेऊन एकडाळ व एक कडधान्याची निवड करण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार, ६ मार्च रोजी बीड येथील केंद्रीय स्वयंपाकगृह असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना हरभरा व तूरडाळ वितरणाबाबतचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र, याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना, संथगतीने कार्यवाही होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, हरभरा, तूरडाळीचे आदेश बदलण्याचा घाट घातला, तर घातला जात नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

------------

जून, २०२० ते एप्रिल, २०२१ या कालावधीतील २२२ दिनांच्या खर्चमर्यादेमध्ये धान्याचा लाभ देण्याचे निर्देश आहेत. पहिली ते पाचवी वर्गातील प्रति विद्यार्थ्यांस ६ किलो, तर सहावी ते आठवीतील प्रति विद्यार्थ्यांस ९ किलो याप्रमाणे धान्यपुरवठा होणार आहे.

-------------

सेंट्रल किचनशेड अंतर्गत बीड शहरातील शाळा - ७६

लाभार्थी विद्यार्थी - १८,०००

------------

===Photopath===

080321\082_bed_17_08032021_14.jpeg

===Caption===

लोकमतने दिलेले वृत्त