नेकनूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:12+5:302021-07-07T04:41:12+5:30

मागील सहा वर्षांपासून अरविंद भैय्या जाधव सामाजिक प्रतिष्ठान बालाघाट सर्कल यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येत होते. जेव्हा ...

Spontaneous response at Neknur | नेकनूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

नेकनूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

मागील सहा वर्षांपासून अरविंद भैय्या जाधव सामाजिक प्रतिष्ठान बालाघाट सर्कल यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येत होते. जेव्हा जेव्हा रक्ताचा तुटवडा भासला गेला, तेव्हा तेव्हा प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर घेऊन प्रतिसाद दिला. बालाघाटावरील समाजसेवक अरविंद जाधव व विशाल शिंदे यांनी नेहमीच रक्तदान शिबिर घेऊन लोकांना जीवदान देण्याचे काम केले. या कामामध्ये बालाघाटावरील लोकांनी, युवा वर्गाने सदैव साथ दिली.

यावर्षीही रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे लोकमत समूह व अरविंद भैय्या जाधव सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या विद्यमाने घेतलेल्या शिबिरात दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान दिले.

या कार्यामध्ये नेकनूरचे एम. एस. शिंदे, रुग्णालयातील कर्मचारी प्रकाश कदम, अमोल हावळे, अशोक जाधव, दीपक मुळे, चागदेव गालफाडे, स्त्री व कुटीर रुग्णालयातील डॉ. करमाळकर, डॉ. दुर्गेश जोशी, सहायक अधिसेविका शेळके विजया, इन्चार्ज मोराळे सुषमा, रजनी कांबळे, वाघमारे वैजयंता, रेड्डी जुली, कोठावळे, सोनवणे, रंजित बांगर, अंकुश मोरे, सरवदे प्रदीप, वाघमारे, तसेच सर्व युवा वर्गाची मोलाची साथ लाभली.

Web Title: Spontaneous response at Neknur