Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 17:36 IST2023-10-17T17:01:06+5:302023-10-17T17:36:29+5:30
भाजपा खासदार प्रीतम मुंडे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून परत निघाल्या होत्या

Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी
माजलगाव: बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे माजलगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाला आल्या असता त्यांची गाडी मराठा समाजाच्या युवकांनी अडवली. युवकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत आवाज का उठवत नाहीत ? असा प्रश्न केला. यावेळी प्रीतम मुंडे यांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचे पहावयास मिळाले.
'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी #MarathaArakshanpic.twitter.com/ejCfrC0bbN
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 17, 2023
भाजपा खासदार प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यात आल्या असता एका कार्यक्रमासाठी त्या माजलगाव या ठिकाणी उपस्थित होत्या. कार्यक्रम आटोपून त्या निघाल्या असता त्यांची गाडी मराठा समाजाच्या काही युवकांनी अडवली.यावेळी या युवकांनी तुम्ही मराठा आरक्षणाला यापूर्वी विरोध केला होता,मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुमचे मत काय ? आताची आरक्षणाबाबतची परिस्थिती काय ? असे प्रश्न विचारले असता खा.प्रीतम मुंडे यांची सुरुवातीला चांगलीच घाबरगुंडी झाली. मात्र त्यानंतर,आरक्षणाबाबत माझा विरोध नसून सरकार लवकरच देणार असल्याचे खा. मुंडे यांनी युवकांना सांगितले. त्यानंतर सर्व युवक निघून गेले.