शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

ऊसतोड मजुरांच्या मुकादमास घातला सहा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 3:48 PM

फसवणुकीचा हा प्रकार सहा वर्षांपूर्वीचा आहे. 

ठळक मुद्देअंबाजोगाई तालुक्यातील घटना

अंबाजोगाई (जि. बीड) : कोल्हापूर कारखान्यास ऊसपुरवठ्यासाठी ट्रॅक्टर व एक ट्रक लावणाऱ्या मुकादमास सहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील मुकादमावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. फसवणुकीचा हा प्रकार सहा वर्षांपूर्वीचा आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धुमडेवाडी येथील रमेश धोंडीबा पाटील यांच्याकडे तीन ट्रॅक्टर व एक ट्रक असून त्याद्वारे ते कारखान्याला ऊस पुरवठा करतात. यासाठी दरवर्षी ते जवळगाव येथून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या घेऊन जातात. नरसिंह मल्हारी गव्हाणे (रा. जवळगाव) याच्याकडून त्यांचे २०१३ साली झालेल्या व्यवहारातील तीन लाख रुपये येणे बाकी होते. २०१४ साली रमेश पाटील हे वसुलीसाठी नरसिंहकडे  गेले. तेव्हा नरसिंह याने चालू वर्षी सहा लाखांत आठ कोयते घेऊन येतो, अशी ग्वाही दिली. त्यासाठी रमेश पाटील यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेऊन आणखी तीन लाख रुपये दिले.

याचे करारपत्र ७ जुलै २०१४ रोजी अंबाजोगाई तहसील कार्यालय येथे केले; परंतु त्यानंतर ते नरसिंह आणि ऊसतोड कामगार यांना कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आले असता तो घर बंद करून निघून गेला होता. तीन दिवस गावात थांबून शोध घेऊनही तो दिसला नाही. अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो आतापर्यंत सापडला नाही. अखेर रमेश पाटील यांनी शुक्रवारी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. याप्रकरणी नरसिंह गव्हाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडMONEYपैसा