शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबाजोगाई - अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या ...

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अंबाजोगाई - अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व जातीवर शिव्या दिल्या. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी बुधवारी दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. अंबाजोगाई शहरातील डॉ.यादव यांना या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यादव कुटुंबीयांचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मंगळवारी रात्री या प्रकरणाचा तपास करताना येथील विलास यादव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली व त्यांना जातीवर शिव्या दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हे जाणीवपूर्वक यादव कुटुंबीयांना त्रास देत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी बुधवारी दुपारी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले व आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे अ‍ॅड.माधव जाधव, गोविंद देशमुख, प्रशांत जगताप, बालाजी शेरेकर, रविकिरण देशमुख, अंगद गायकवाड, धर्मराज सोळंके, प्रशांत आदनाक, लहू शिंदे, बाळासाहेब शिंदे, अभिजीत लोमटे, संतोष मोहिते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

070721\img-20210707-wa0070.jpg

मराठा क्रांती मोर्चाचे उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन