शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई बसस्थानकात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

पाणी आहे; पण लाइट गुल, उभी पिके संकटात अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित ...

पाणी आहे; पण लाइट गुल, उभी पिके संकटात

अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित होतो. जिथे वीज पुरवठा सुरू आहे, तिथे अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे विद्युत पंप चालत नाही. त्यामुळे शेतातील ऊस, भाजीपाला व विविध पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.

कोरोनाचे संकट व त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिल भरण्याची स्थिती नसताना वीज मंडळाने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.

‘मास्कचा नियमित वापर गरजेचा’

बीड : कोरोनावर मात करण्यासाठी बीड शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर नियमितपणे केला पाहिजे, असे प्रतिपादन समाजसेविका सुरेखा जाधव यांनी केले. जाधव यांनी म्हटले की, कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी मोठे सहकार्य केले. त्याच पद्धतीने आताही काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत, शिवाय घर व परिसरात स्वच्छता राखावी, सॅनिटायझरचाही वापर नियमित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.

रस्त्याच्या कामाला सुरुवात

धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

दारूची विक्री बंद करण्याची मागणी

आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.