शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आरोग्य विभागाच्या ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ला अल्प प्रतिसाद; १८ जिल्ह्यातून एकही कॉल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:00 IST

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ही वेब साईट तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंतची वेळ आहे. किरकोळ आजारावर घरबसल्या उपचारास १८ जिल्ह्यांचा ठेंगा

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ आजारांबाबत घरातूनच उपचाराचा सल्ला घेता यावा म्हणून आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन औषधोपचार वेबसाईटला तब्बल १८ जिल्ह्यांनी ठेंगा दिला आहे. ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ या वेबसाईटवर गुरुवारी एका दिवसात राज्यातील या जिल्ह्यांतून एकही कॉल आला नाही. सर्वाधिक २४ कॉल रायगड जिल्ह्यातून आले.

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ही वेब साईट तयार करण्यात आली आहे. यद्वारे देशातील प्रत्येक व्यक्तीला किरकोळ आजारांवर घर बसल्या मार्गदर्शन आणि सल्ला दिला जात आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेळ असून महाराष्ट्रासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंतची वेळ आहे. यावर लोक त्यांच्याशी संवाद साधून उपचार घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या या वेबसाईटला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.  गुरुवारी यासंदर्भात आढावा घेतला. 

१८ जिल्ह्यांतूनही एकही कॉल नाही३६ पैकी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथून एकही कॉल आला नाही .

कसा साधायचा संपर्क? गुगलमध्ये ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ ही साईट उघडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. तो त्यात टाकून पुढे आपले पूर्ण नाव, वय, जिल्हा, राज्याची निवड करावी. त्यानंतर आपला आजार काय आणि काय मार्गदर्शन हवे, याबाबत बातचीत करावी. आपल्या आजाराबद्दल सुरुवातीला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला औषधांची नावे येतात.

कोठून किती प्रतिसाद २४ कॉल हे रायगड जिल्ह्यातील जनतेने केले. पुणे १४, मुंबई शहर ११, लातूर ९, औरंगाबाद ८, मुंबई ७, अकोला ४, नागपूर ४, तर पालघरमधून २ कॉल आले.

याबाबत वारंवार जनजागृती केली. तरीही प्रतिसाद मिळत नाही, हे खरे आहे. नागरिकांनीच जागरूक होऊन याचा लाभ घेण्याची गरज आहे. आणखी एकदा याचा आढावा घेऊन सूचना केल्या जातील.-डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

आठ जिल्ह्यांतून केवळ एक कॉल अहमदनगर, बीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, नांदेड, नाशिक, सांगली या ८ जिल्ह्यांतून दिवसभरात केवळ एक कॉल आला. 

टॅग्स :Healthआरोग्यonlineऑनलाइनhospitalहॉस्पिटल