शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून चार लाखांची पितळी भांड्याची मोड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

बीड : बार्शी रोडवर असलेल्या एका भांड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. आतील पितळी ...

बीड : बार्शी रोडवर असलेल्या एका भांड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. आतील पितळी भांडे चोरून नेले, या भाड्यांची किमंत अंदाजे चार लाख रुपयांपर्यंत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. चोरट्यांने माल नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनाचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ज्ञानेश्‍वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर साई स्टील स्क्रॅप नावाचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्याने या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात पितळी भांड्याची मोड मोठ्या प्रमाणात होती. जवळपास ८ ते ९ पोत्यामध्ये पितळी मोड ठेवण्यात आली होती. ही सर्व पितळी मोड चोरट्याने लंपास केली. मोड नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनांचा उपयोग केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी जवकर यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानुसार ठाण्याचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड, पठाण, शेख मोहसीन यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गस्त वाढवण्याची मागणी

मागील काही दिवसापांसून शहरात मध्यरात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने दुचाकीवर (चार्ली) पेट्रोलींग केली जाते. मात्र, वाढत्या घटना पाहता तसेच बीड शहरात गस्त वाढवावी, जेणेकरून मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर चोऱ्या होणार नाहीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.