शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांच्या वेळा वाढवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. ...

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. मात्र, शासनाने दुकाने सुरू करण्याचा वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ठेवल्याने, त्यांना काही जीवनावश्यक व इतर वस्तू घेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानाच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेश गुप्ता, गोपाळ धायगुडे, अतुल जाधव यांनी केली आहे.

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबा ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी साठविण्याची गरज

अंबेजोगाई : दरवर्षी अंबेजोगाई शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मोठा पाऊस होऊनही आठवड्यातून एकदा पाणी मिळते. मात्र, तरीही रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम आपल्या घरी करावा. मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची अडचण

अंबेजोगाई : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते, अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवीपासून तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे

अंबेजोगाई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहिती घेत नाहीत, त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एक खिडकी योजना राबवा

अंबेजोगाई : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली, तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एक खिडकी ही योजना राबवून, शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबविली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड.सुभाष शिंदे यांनी केली आहे.