मैत्रीला काळिमा! मुलीला दवाखान्यात नेताना बापाच्या मित्राचे असभ्य वर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:35 IST2026-02-18T14:30:26+5:302026-02-18T14:35:02+5:30

१३ वर्षांच्या चिमुरडीने घरी येताच सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

Shocking Incident in Kaij: 13-Year-Old Girl Harassed by Father's Friend on Bike; Accused Remanded to Custody | मैत्रीला काळिमा! मुलीला दवाखान्यात नेताना बापाच्या मित्राचे असभ्य वर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मैत्रीला काळिमा! मुलीला दवाखान्यात नेताना बापाच्या मित्राचे असभ्य वर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

केज (जि. बीड) : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीला औषधोपचारासाठी दवाखान्यात मोटारसायकलवर घेऊन जात असताना मित्रानेच मुलीशी लगट करत असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा शनिवारी रात्री अचानक कान दुखू लागला. मुलीच्या वडिलांनी रात्री १० च्या सुमारास आपल्या दुचाकीवर मुलीला घेऊन दवाखान्यात जाण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी सोबत मदत म्हणून आपला मित्र किशोर लक्ष्मण कांबळे (वय ३२) यालाही घेतले. दोघांच्या मध्ये मुलगी दुचाकीवर बसली होती. धनेगाव येथील डॉक्टरांकडे उपचार करून परत येत असताना, आरोपीने लगट करत असभ्य वर्तन केले. घरी परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकून हादरलेल्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

आरोपीला पोलिस कोठडी
मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून किशोर कांबळे विरुद्ध रविवारी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी आरोपीला मंगळवारी केज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

Web Title : विश्वासघात! अस्पताल जाते समय दोस्त ने नाबालिग बेटी से की छेड़छाड़; पोक्सो मामला दर्ज।

Web Summary : बीड में, एक व्यक्ति को अपने दोस्त की 13 वर्षीय बेटी को डॉक्टर के पास ले जाते समय यौन उत्पीड़न करने के आरोप में गिरफ्तार किया गया। पोक्सो का मामला दर्ज किया गया है। लड़की ने अपने माता-पिता को बताया, जिन्होंने तुरंत पुलिस को सूचित किया।

Web Title : Betrayal! Friend assaults minor daughter on way to hospital; POXSO filed.

Web Summary : In Beed, a man was arrested for sexually assaulting his friend's 13-year-old daughter while taking her to the doctor. A POXSO case has been registered. The girl confided in her parents, who immediately reported the incident to the police.