शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या ; एक महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:59 IST

याप्रकरणी पोलिसांनी १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

- दीपक नाईकवाडेकेज ( बीड ) : एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना मांगवडगाव (ता.केज) येथे बुधवारी रात्री (दि.१३) ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या वादातून १० ते १५ जणांनी हल्ला करून या हत्या केल्या असाव्यात. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी मृतांच्या तीन मोटार सायकलसह जीवनावश्यक वस्तूसुद्धा जाळण्यात आल्या आहेत. यातून हल्लेखोरांची निर्घृणता दिसून येते आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील मांगवडगाव येथील पवार कुटुंब हे शेतीच्या वादामुळे सन २००६ साला पासून अंबाजोगाई येथील यशवंत राव चौकात वास्तव्यास होते. साधारण दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पवार कुटुंबातील चार भाऊ व त्यांचे कुटुंब ट्रॅक्टर मधून मंगवडगाव येथे आले होते. पवार कुटुंब आल्याची माहिती मिळताच रात्री १० ते १५ जणांनी तलवार ,लोखंडी गज याने हल्ला केला. यात बाबू शंकर पवार वय ७० वर्ष , प्रकाश बाबू पवार वय 50 वर्ष  , संजय बाबू पवार वय ४६ वर्ष या पिता पुत्रांची निर्घृण हत्या केली. तर दादुल्या प्रकाश पवार या महिलेस मारहाणीत गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे व केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी  घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. तर जखमी महिलेस अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. घटनास्थळी अंबाजोगाई ,केज ,युसुफ वडगाव पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी जवळपास एक किलो मीटरचा परिसर  सिल केला असून पुढील तपास सुरू आहे.

१३ संशयितांना ताब्यात घेतलेया घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी मध्यरात्री ३ च्या सुमारास भेट दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, १३ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस  युसूफ वडगावचे सपोनि. आंनद झोटे यांनी दिली आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीड