नांदेवाली येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST2021-02-23T04:50:53+5:302021-02-23T04:50:53+5:30

ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच ओमप्रकाश जोजारे, उपसरपंच सोनाली थिटे, चंद्रकांत थिटे, ग्रामसेवक महादेव जाधव यांनी ...

Shiva Jayanti celebration at Nandewali | नांदेवाली येथे शिवजयंती साजरी

नांदेवाली येथे शिवजयंती साजरी

ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच ओमप्रकाश जोजारे, उपसरपंच सोनाली थिटे, चंद्रकांत थिटे, ग्रामसेवक महादेव जाधव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले, तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक गणेश मिसाळ यांनी शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. यात श्रीनिवास उगले यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सरपंच ओमप्रकाश जोजारे, उपसरपंच सोनाली थिटे, डाॅ.शशिकांत कडेपूरकर, लक्ष्मण चांदणे, राम शेळके, चंद्रकांत राजहंस, चंद्रकांत थिटे, श्रीनिवास उगले, माउली थिटे, भारत कातखडे, सतीश कडेपुरकर, रामनाथ जवरे, सुरेखा बारगजे, मीना बांगर, पार्वती दहीफळेसह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक गणेश मिसाळ यांनी तर आभार रामनाथ जवरे यांनी मानले.

===Photopath===

210221\vijaykumar gadekar_img-20210221-wa0012_14.jpg

Web Title: Shiva Jayanti celebration at Nandewali