'दोन हात करायची वेळ आली, तर आम्हीही कमी पडणार नाही'; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:05 IST2022-03-24T12:04:47+5:302022-03-24T12:05:48+5:30

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

Shiv Sena MP Omraje Nimbalkar has criticized the ministers and MLAs in the maharashtra government. | 'दोन हात करायची वेळ आली, तर आम्हीही कमी पडणार नाही'; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

'दोन हात करायची वेळ आली, तर आम्हीही कमी पडणार नाही'; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

बीड- बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता दिसून येत आहे. बीडमधील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियाना दरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

उस्मानाबादेत आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र बीडमध्ये उलट असल्याचं म्हणत त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधला आहे. 

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाही. त्यामुळे कृपा करुन आम्हालाही तुम्ही डिस्टर्ब करू नका. तसेच दोन हात करायची वेळ आली तर आम्हीही कमी पडणार नाही, असा थेट इशारा देखील निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत दरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Shiv Sena MP Omraje Nimbalkar has criticized the ministers and MLAs in the maharashtra government.