बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:41 IST2025-09-05T10:40:25+5:302025-09-05T10:41:59+5:30

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Series of murders continues in Beed district; Shepherd youth murdered in the early hours of the morning at Patoda | बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

पाटोदा ( बीड) : शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा पोलिस चौकी हद्दीतील दगडवाडी येथे शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाचा खून झाला. दीपक केरा भिल्ल (वय १९, रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दीपक आपल्या कुटुंबीयांसोबत मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आला होता. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास एकनाथ भोसले (वय ५२, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) याने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि त्यानंतर तो फरार झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या खुनाच्या घटनांच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. घटनेनंतर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संभाजी तागड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Web Title: Series of murders continues in Beed district; Shepherd youth murdered in the early hours of the morning at Patoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.