Satish Bhosale ( Marathi News ) : बीडमधील मारहाण प्रकरणी सतीश भोसले याला बीडपोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. आरोपी भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता सतीश भोसले याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हरिण, मोर, ससा आणि इतर काही वन्य प्राण्याच्या शिकारी केल्याप्रकरणी आणि वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केल्या प्रकरणी सतीश भोसलेवर वनविभागाकडून मोठा कारवाई केली आहे. वनविभागाने भोसले विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत.
गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर, महाराष्ट्रात लोडशेडिंग; ५५ मिनिटांचा ‘पॉवर’ ब्लॉक
काही दिवसापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचा या व्हिडीओ व्हायरल झाला होता. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. त्याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आता वनविभागाने मोठी कारवाई केली आहे.
अतिक्रमण प्रकरणी गुन्हा दाखल
८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडी केली होती त्यावेळी शिकारीसाठी लागणाऱ्या काही वस्तू व वाळलेल्या प्राण्याचे मास आढळले होते. त्या आधारे वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सतीश उर्फ खोक्या भोसले वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून राहतो या विरोधात सुद्धा वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सतीश भोसले याचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्यागुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली. सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले. सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केल्या होत्या.