शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहार प्रकरणी ढोरगावच्या सरपंच यमुना सरवदे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

अपर विभागीय आयुक्तांचा निर्णय : ग्रामसेवक निलंबित माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील सरपंच यमुना ग्यानबा सरवदे यांना गावांत ...

अपर विभागीय आयुक्तांचा निर्णय : ग्रामसेवक निलंबित

माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील सरपंच यमुना ग्यानबा सरवदे यांना गावांत राबविलेल्या विविध शासकीय योजनेत कामे न करता गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी अपात्र ठरवले आहे.

तालुक्यातील ढोरगाव ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांच्या तक्रारीनुसार गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता गावातील समाज मंदिरासमोरील पेवर ब्लॉक काम पूर्ण न करता ३३ हजार रुपये उचलले. जिल्हा परिषद शाळेजवळील नालीकाम अर्धवट ठेवून ४३ हजार ५०० रुपये उचलले, शाळेतील टीव्ही संचाबद्दल २२ हजार ६०० रुपये उचलले. पाणी फिल्टर नादुरूस्त प्रकरणी १९ हजार व २३ हजार रुपये उचलले. परंतु ही कामे केली नाही, तसेच दलित वस्ती सुधार योजनेत निकृष्ट सौर पथदिवे बसवले यासह विविध तक्रारीची चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली. तसा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे हे प्रकरण गेले व सुनावणी झाली. सरपंचांचा खुलासा समाधानकारक नसल्याने व ते सतत गैरहजर असल्याने अखेर विभागीय विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९-१ नुसार सरपंच यमुना गेनबा सरवदे या पुढील काळासाठी अपात्र असल्याचा निकाल २६ मार्च रोजी दिला आहे. या निकालामुळे खळबळ उडाली आहे.

सहा सदस्यांची होती तक्रार

तालुक्यातील ढोरगाव ग्रामपंचायतच्या सुखदेव अर्जुन मुळे, यशवंत मारुती सातपुते, छगन दौलत सरवदे,दत्ता प्रकाश आबूज,शोभा भारत सातपुते, सुनीता छगन सरवदे या सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. गावातील सरपंच यमुना गेनबा सरवदे व ग्रामसेवकांनी मिळून विविध कामात गैरवापर केल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे १८ जानेवारी २०१९ रोजी केली होती.

सीईओंचा आयुक्तांकडे अहवाल

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२० रोजी ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाहीस सरपंच पात्र असल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या बाबत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले तसेच त्याची एक वर्षाची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली.