Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी धनंजय देशमुखांनी घेतला मोठा निर्णय; हायकोर्टातील याचिका मागे घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:41 IST2025-01-07T13:40:08+5:302025-01-07T13:41:09+5:30
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने तपास सुरू केला आहे. तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी धनंजय देशमुखांनी घेतला मोठा निर्णय; हायकोर्टातील याचिका मागे घेतली
Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी एसआयटी आणि सीआयडीने तपास सुरू केला आहे, आतापर्यंत तीन मुख्य संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीआधी त्यांनी मोठा निर्णय घेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.
Walmik Karad : "समाजसुधारक वाल्मीक कराडचे ५ वाईन शॉप..."; अंजली दमानिया यांनी पुरावाच दिला
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून वाल्मीक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, आणि मोक्का लावण्याची मागणी केली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी ही याचिका धनंजय देशमुख यांनी मागे घेतली आहे.
माध्यमांसोबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, सध्या सुरू असलेल्या तपासावर समाधानी आहे. यामुळे त्यांनी ही याचिका वकीलामार्फत मागे घेतली आहे. दरम्यान, आज धनंजय देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडवर केला आरोप
खंडणी प्रकरणावरुनच मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे, दमानिया यांनी ट्विट करुन वाल्मीक कराड याच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत.
इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' लाँच; पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार
वाल्मीक कराड याला अनेकांनी समाज सुधारक असं संबोधले आहे. यावरुन दमानिया यांनी समाज सुधार वाल्मीक कराड याचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. या ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. वाल्मीक कराड याची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनशॉप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे.