शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

धारूर शहरात १९३ घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

धारूर : पंतप्रधान घरकुल योजनेतून धारूर नगरपरीषद हद्दीत ७४ घरकुलांचे काम प्रगतीप्रथावर असून आणखी १९३ घरकुलांना मंजुरी ...

धारूर : पंतप्रधान घरकुल योजनेतून धारूर नगरपरीषद हद्दीत ७४ घरकुलांचे काम प्रगतीप्रथावर असून आणखी १९३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या घरकुलांचे काम सुरू होणार असून योग्य कालावधीत कसे पुर्ण होतील या साठी नगर परीषद प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

धारूर नगर परीषदेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रत्येक कुंटूंबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हा या योजनेचा हेतू असून धारूर नगरपरीषद हद्दीत पहिल्या टप्प्यात ७४ घरकुल मंजूर होते. या पैकी बहूतांशी पुर्ण झाले असून काहीचे काम अंतीम टप्प्यात आहे. आता पुन्हा १९३ घरकुलांना मंजूरी मिळाली असून जे प्रस्ताव परिपूर्ण होते असे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर त्रुटींअभावी राहिलेल्या प्रस्तावास लवकरच मंजूरी मिळण्यासाठी नगर परीषद प्रशासन प्रयत्न करत आहे.

राज्य शासना कडून मिळणारा निधी प्रत्येकी एक लाख रुपये नगरपरीषदेकडे उपलब्ध असून केंद्राकडून मिळणारा दिड लाख रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होईल. कामाच्या प्रगतीनुसार हा निधी टप्प्या टप्प्याने दिला जातो, असे नगर परीषदेतील या विभागाचे अभियंता विष्णू कराड यांनी सांगितले.

सर्व लाभार्थ्यांचा समावेश

धारूर शहरात पहिल्या टप्प्यातील ७४ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून नव्याने मंजूर १९३ घरकुलांचे काम चांगल्या दर्जाचे व वेगाने पूर्ण कसे होईल यासाठी नगर परिषद प्रशासन काम करत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांचा यात समावेश असल्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

===Photopath===

090421\4505img-20210409-wa0125_14.jpg