ओबीसींच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रासपचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:36+5:302021-07-05T04:21:36+5:30

समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली असून, दररोज सरकारविरोधात आंदोलने सुरू आहेत. ...

RSP's jail in Beed for OBC reservation | ओबीसींच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रासपचे जेलभरो

ओबीसींच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रासपचे जेलभरो

समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली असून, दररोज सरकारविरोधात आंदोलने सुरू आहेत. रविवारी बीड येथील महालक्ष्मी चौकात रासपाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनास युवा मल्हार सेनेचाही पाठिंबा होता.

राज्य सरकारने ओबीसी आयोगाची स्थापना करून, न्यायालयीन बाबींच्या पूर्तता करून काम सुरू करावे, ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा तातडीने जमा करून न्यायालयात द्यावा, ओबीसी आरक्षण स्थगिती जोपर्यंत उठविली जात नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले. या आंदोलनात रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णू देवकते आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------

Web Title: RSP's jail in Beed for OBC reservation