शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बीडमध्ये ५५ लाखांचा धान्य घोटाळा; तीन गोदाम व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:27 PM

याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

ठळक मुद्दे१४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली.परमिट  एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून तब्बल ५५ लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

अतुल अरविंद झेंड, संजय नारायण हांगे व नितीन तुकाराम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन गोदाम व्यवस्थापकांची नावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामात २० फेब्रुवारी २०१८ रोजी व्यवस्थापकांच्या अहवालातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली. त्यांनी हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. त्याप्रमाणे २४ मार्च २०१८ रोजी पुरवठा विभाग, औरंगाबादच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च २०१८ ला अपर जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले.

या पथकाने चौकशी करून अहवाल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामध्ये ५५ लाख ३ हजार ५०९ रूपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी त्याचे अवलोकन केले, मात्र निर्णय झाला नव्हता. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावर निर्णय घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गवळी यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे फसवणूक व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे करत आहेत. 

असा केला अपहार तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद झेंड व संजय नारायण हांगे यांनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत १५५८ क्विंटल धान्य (किंमत ३८ लाख ७ हजार ३५७ रूपये), संजय हांंगे यांनी याच कालावधीत साखरेच्या मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करून ५७३.४४ क्विंटल साखरेचा (किंमत १४ लाख ७ हजार ७७७ रूपये) घोटाळा केला. याच कालावधीत नितीन तुकाराम जाधव यांनी ३ आॅक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ११२.०५ क्विंटल (किंमत २३ लाख ८ हजार ३७४ रूपये) धान्याचे मुळ धान्य परमिट एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

धान्यमाफियांची साखळी सक्रियशासकीय धान्य गोदामातून गरिबांसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची साखळी आहे. काहीही घोटाळा झाला की चौकशी अधिकारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करतात. धान्यमाफियांची एक साखळी बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. गरिबांना उपाशी ठेवून धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार यावरून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कांबळे एसीबीच्या जाळ्यातयाच प्रकरणाची चौकशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे होती. त्याचा अहवाल गोदाम व्यवस्थापकांच्या बाजूने देण्यासाठी कांबळेंनी ५ लाख रूपयांची लाच मागितली होती. याचवेळी एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस