शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतचे ढीग वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढीग वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे ...

बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढीग वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात घडू लागले आहेत. एक तर रस्ता दुरुस्त करा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढीग टाकण्यात आले. मात्र, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्ता दुरुस्त करून, ढीग उचलण्याची मागणी आहे.

आरोग्याची काळजी घ्यावी

अंबेजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने, आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच अंबेजोगाई तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक नागरिकांना सर्दी, ताप येणे, मळमळणे, असे विविध आजार जाणवू लागले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच कोरोनाची साथ सुरू असल्याने लक्षणे आढळतात. रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करा व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन केले जात आहे.

रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारक हैराण

पाटोदा : शहर व परिसरात बीएसएनएलची मोबाइल सेवा सातत्याने विसकळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला, तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल, तर आउट ऑफ कव्हरेज एरिया, असे उत्तर मिळते. अशीच स्थिती इंटरनेट कनेक्शनच्या बाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाइलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही, अशा स्थितीमुळे मोबाइलधारक हैराण झाले आहेत.