शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

या आरक्षण सोडतीमध्ये ९१ गावांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण, तसेच अनुसूचित जाती महिला आरक्षण, ...

या आरक्षण सोडतीमध्ये ९१ गावांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण, तसेच अनुसूचित जाती महिला आरक्षण, अनुसूचित जमाती महिला आरक्षण, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण व सर्वसाधारण महिला आरक्षण, असे त्यात महिला ४६, तर पुरुष ४५ ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणार आहेत. ही सोडत सुरू करण्यापूर्वी मुंबई ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम १९६४ नियमातील तरतुदी सर्वांना समजावून सांगण्यात आल्या, तर १९९५ ते २०२० पर्यंत ग्रामपंचायत कोणत्या जागेसाठी राखीव होते ते ग्रामपंचायतनिहाय वाचून दाखविण्यात आले.

अनुसूचित जाती महिला एकदरा, काळेगावथड्डी, घळाटवाडी, लहामेवाडी, नागडगाव, शिंदेवाडी, पायतळवाडी, टालेवाडी, तर अनुसूचित जाती मंजरथ, सांडस चिंचोली, मनूरवाडी, गोविंदवाडी, सिमरी पारगाव, हरकी लिमगाव, मोठेवाडी, तर अनुसूचित जमातीसाठी दिंद्रुड ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये महिला गव्हाणथडी, खरात आडगाव, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, पिंप्री खुर्द, वारोळा, सुर्डी नजीक, बाभूळगाव, राजेवाडी, मनूर, साळेगाव, बारभाई तांडा यांचा समावेश करण्यात आला. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये किट्टीआडगाव, पिंप्री खुर्द, महातपुरी, गव्हाणथडी, खेर्डा गुर्द, फुलपिंपळगाव, लवूळ, चिंचगव्हाण, मनूर, काळेगाव, ढेपेगाव, मंगरूळ यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५१ ग्रामपंचायत आरक्षण पाडण्यात आले असून, त्यात सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती पुनंदगाव, वाघोरा, पिंपळगाव नाखले, शहाजानपूर, खतगव्हाण, शिंपेटाकळी, रेणापुरी, ब्रह्मगाव, शहापूर मजरा, सरवर पिंपळगाव, सुरूमगाव, पात्रुड, देवखेडा, रोषणपुरी, गोविंदपूर, शिंदेवाडी-पात्रुड, सादोळा, निपाणी टाकळी, छोटेवाडी, तालखेड, शेलापुरी, हिवरा ब्रु., आनंदगाव, सोन्नाथडी, उमरी बु., गंगामसला.

सर्वसाधारण सरपंचपदासाठीचे आरक्षण छत्रबोरगाव, छोटेवाडी, शु. लिमगाव, डुब्बामजरा, ढोरगाव, मालीपारगाव, मोगरा, शिंपेटाकळी, गुंजथडी, फुलेपिंपळगाव, नित्रुड, रामपिंपळगाव, आबेगाव, सुलतानपूर, लोनगाव, सावरगाव, केसापुरी, तेलगाव खुर्द, सोमठाणा, लुखेगाव, वांगी बु., टाकरवण, रिधोरी, कोथरूळ, राजेगाव.

वरीलप्रमाणे सोडत काढल्यानंतर उपस्थितांना आरक्षण यादी वाचून दाखविण्यात आली. अशा रीतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग याचे आरक्षण काढण्यात आले. उपस्थितांपैकी कोणाचीही लेखी अथवा तोंडी तक्रार आली नाही. सर्व उपस्थितांचे आभार मानून तहसीलदार वैशाली पाटील यांनी सोडत जाहीर केली.