शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; इंधन दरवाढीच्या विरोधात परळीत शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 17:34 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकार यावर काही उपयायोजना करत नसल्याने महागाई वाढली असल्याचा आंदोलकांचा आरोप.

परळी-  इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गॅस सिलेंडरची तिरडीवर अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला.    

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकार यावर काही उपयायोजना करत नसल्याने महागाई वाढली असल्याचा आंदोलकांनी आरोप केला. याचा निषेध करत संतप्त शिवसेना आंदोलकांनी  गॅस सिलेंडर तिरडीवर ठेवत यात्रा काढली. तसेच आंदोलकांनी बैलगाडीत मोटार सायकल ठेऊन आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलकांनी इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी केली. 

आंदोलनास शहरातील मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून सुरुवात झाली. पुढे मोंढा मार्केट, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर आंदोलक धडकले. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यानंतरही इंधन दर वाढत गेले तर शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. 

आंदोलनासाठी उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, भविसे जिल्हा संघटक अतुल दुबे, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, विधानसभा संघटक राजा भैया पांडे, तालुका सचिव रामराव माने, सतीश अण्णा जगताप, युवा सेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उप शहर प्रमुख मोहन राजमाने, किशन बुंदेले, भविसे उपजिल्हा संघटक मोहन परदेशी, युवासेना शहर प्रमुख कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, तुकाराम अप्पा नरवाडे, शहर संघटक अनिल शिंदे, अश्रूबा काळे, गजानन कोकीळ, बाबा सोनवणे, युवक नेते विशाल देशमुख, कैलास कावरे, अतुल शिंदे, संपत शिंदे, नितीन जाधव, नागेश मुरकुटे, उमेश सोळंके, महेश सोनवणे, वैजनाथ सलगर, विष्णू सलगर, नागनाथ सलगर, , विश्वनाथ पंजरकर, अजय आवड, बबन ढेमरे, नवनाथ सरवदे, विशाल गावडे, भास्कर पाटील, विशाल शिंदे आदींनी प्रयत्न केले. 

टॅग्स :BeedबीडShiv Senaशिवसेना