शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

वृद्धांना उतारवयात दिलासा; लवकरच सुरु होणार स्वतंत्र दवाखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:48 PM

पुणे व औरंगाबादमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

ठळक मुद्देआरोग्य संस्थांमध्ये विशेष वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार

- सोमनाथ खताळ

बीड : वृद्धापकाळात वाढते आजार, काही वेळा कुटुंबाकडून होणारे दुर्लक्ष, रुग्णालयांतील गर्दी आदी मुद्दे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने वृद्धांसाठी नव्या वर्षात स्वतंत्र क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयात ही सुविधा असणार आहे. 

पुणे व औरंगाबादमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय वृद्धापकालीन आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वृद्धांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. जिल्हा, उपजिल्हा, स्त्री, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. याच आरोग्य संस्थांमध्ये विशेष वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच सर्वांना याबाबत जिल्हा स्तरावर प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात  महिलांसाठी पाच व पुरूषांसाठी पाच असे १० बेड असणार आहेत. रोज नियमित तपासणी (ओपीडी) असणार आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आठवड्यातून दोन दिवस, प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस तपासणी होईल. उपकेंद्र स्तरावर डॉक्टर, परिचारिकांमार्फत आढावा घेऊन वृद्धांवरील उपचारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

चंद्रपूरला यशस्वी प्रयोगयापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धांसाठी प्रायोगिक तत्त्वावर क्लिनिक सुरू केले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. 

बीड जिल्ह्यात होणार अंमलबजावणीजिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठिकाणी वृद्धांसाठी विशेष तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यासाठी आमचे पथक प्रशिक्षण घेऊन आले आहे. जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात प्रशिक्षण दिले जाईल. लवकरच बीड जिल्ह्यात याची अंमलबजावणी करणार आहोत.-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Healthआरोग्यSenior Citizenज्येष्ठ नागरिकBeedबीडdoctorडॉक्टर