शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

'बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा'; दबाव टाकत दलालाची रजिस्ट्रारला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 17:50 IST

काही वेळाने पोलीस रजिस्ट्री कार्यालयात आले. त्यांच्या समोरही हा वाद सुरूच होता.

माजलगाव : येथील रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू असून शुक्रवारी या दलालांनी बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करावी यासाठी येथील रजिस्ट्रारवर दबाव टाकला. एवढ्यावरच न थांबता दलालाने रजिस्ट्रारला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

येथील रजिस्ट्री कार्यालयाला दलालांनी चांगलेच वेढले आहे. हे दलाल बोगस कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रजिस्ट्री करून घेत असल्याचे अनेक प्रकार सर्रास होत असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक दलाल एका जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आला. रजिस्ट्रार पी.एम.राठोड त्याने दिलेली कागदपत्रे तपासू लागले. यावेळी राठोड यांना कागदपत्रामध्ये ही जागा बागायतीमध्ये येत असतांना ही रजिस्ट्री जिरायतीत दाखवण्यात आली असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी बागायती क्षेत्राची जिरायती म्हणून रजिस्ट्री होऊ शकणार नाही असे सांगितले. यामुळे दलाल व रजिस्ट्रारमध्ये वाद होऊन प्रकरण मारामारीपर्यंत गेले. काही वेळाने पोलीस रजिस्ट्री कार्यालयात आले. त्यांच्या समोरही हा वाद सुरूच होता. कार्यालयात जवळपास दोन तास सुरू असलेल्या या वादामुळे रजिस्ट्रीसाठी आलेल्या अनेकांना ताटकळत बसावे लागले. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. 

आर्थिक व्यवहारातून झाला वादबागायती क्षेत्र असतांनाही बोगस कागदपत्रे तयार करून शासनाला लाखोंचा चुन्ना लावला जात आहे. शुक्रवारी रजिस्ट्रार व दलालात आर्थिक व्यवहार पूर्ण झाला नाही. यातून रजिस्ट्रार यांनी अनेक त्रुटी काढल्या. यामुळे हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे सांगत होते.

रजिस्ट्रारची तक्रार नाहीकार्यालयात मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना ही  रजिस्ट्रारने गुन्हा दाखल का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे . आपण त्या लोकांची तक्रार दिल्यास आपलेच कारमाने उघड होतील या भितीने रजिस्टार पी.एम.राठोड यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा होत आहे.

अनेक जण चुकीचे कागदपत्रे आणून बागायती क्षेत्र असतांना जिरायती क्षेत्र दाखवत रजिस्ट्री करण्यासाठी दबाव टाकतात. यातून हा प्रकार घडला. मला कसल्याही प्रकारची मारहाण झाली नाही.- पी. एम. राठोड, रजिस्ट्रार 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी