संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:15 IST2025-01-04T11:57:08+5:302025-01-04T12:15:47+5:30

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pune connection is coming to light in the Santosh Deshmukh murder case doubts are being raised by Dhananjay Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप

Beed Sarpanch Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २५ दिवसांनी मुख्य आरोपींना अटक झालेली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातील बालेवाडीतून अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे. सर्व आरोपी पुण्यातच असून यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला एसआयटीच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेतलं. दोघांनाही आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाने पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याआधी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा देखील पुण्यात सीआयडीसमोर शरण आला होता. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर येत आहे. यावरुन धनंजय देशमुख यांनी शंका उपस्थित केली आहे.

"सर्व आरोपींना ज्याने घटना घडायच्या अगोदर आणि घटनेनंतर मदत केली त्याचा तपास होऊन त्याला योग्य शिक्षा मिळायला हवी. या प्रकरणाचा योग्य तपास चालू आहे आणि लवकरच गुन्हेगार जेरबंद होतील. या प्रकरणातील जो आरोपी फरार आहे तो ताब्यात आल्यानंतर या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येईल. ही संघटित गुन्हेगारी आहे. या गुन्हेगारांना अभय भेटले आहे म्हणून त्यांनी इतक्या निर्घृणपणे कृत्य केलेले आहे," धनंजय देशमुख म्हणाले.

"या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार आहे. पुण्यातून हे सगळे सापडत आहेत म्हणजे ते सर्व एकाच जागेवर आहेत. त्यांना तिथे कोणी आश्रय दिला हे स्पष्ट होणार आहे. हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत. साधे गुन्हेगार नाहीत. महाराष्ट्रात २५ दिवस लपून राहतात ही सर्वसामान्य माणसे नाहीत. या विकृतीचा समूळ नायनाट केला पाहिजे. सर्व आरोपी पुण्यात आहेत म्हणजे त्यांना कोणी जबाबदारीने तिथे ठेवले आहे," असंही धनंजय देशमुख म्हणाले.

सुदर्शन घुले केवळ प्यादं, मुख्य आरोपी तर आकाच - सुरेश धस

दरम्यान, सुदर्शन घुलेच्या अटकेनंतर या प्रकरणाचा पाठवपुरावा करणारे भाजप आमदार यांनी मोठं विधान केलं आहे. "यातला एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्णा आंधळे तो पोरगा राहिला आहे. सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी नाही ते प्यादं आहे. त्याच्या पाठीमागचा मुख्य आरोपी हा कोण आहे, तो शोध पोलिसांनी शोधला पाहिजे. यातला मुख्य आरोपी हा आका आहे. मी ज्यांचा उल्लेख आका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी आहे. बाकीचे प्यादी आहेत," असं सुरेश धस यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं.

Web Title: Pune connection is coming to light in the Santosh Deshmukh murder case doubts are being raised by Dhananjay Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.