पोथरा रस्त्याची दुरवस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST2021-01-22T04:30:56+5:302021-01-22T04:30:56+5:30

धारूर - आडस रस्त्याची डागडुजी सुरू धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या ...

Poor road condition persists | पोथरा रस्त्याची दुरवस्था कायम

पोथरा रस्त्याची दुरवस्था कायम

धारूर - आडस रस्त्याची डागडुजी सुरू

धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

विनामास्क न फिरण्याचे आवाहन

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

धारूर स्थानकासमोर ‘नो पार्किंग’चा बोजबारा

धारूर : धारूर बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजबारा उडाला आहे. सर्रास याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बीड बसस्थानकात खड्डे; त्रास वाढला

बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच बसेसही खिळखिळ्या होत आहेत. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Web Title: Poor road condition persists