शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : शहरातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या तुटून पडल्या आहेत. यामुळे ...

अंबाजोगाई : शहरातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या तुटून पडल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शौचलयांची मोडतोड होत आहे. तसेच शौचालयांची स्वच्छता वारंवार होत नसल्याने वाढत्या दुर्गंधीमुळे त्याचा वापर टाळला जात आहे. स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन शौचालयांची दुरवस्था दूर करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

महिला बचतगट आर्थिक संकटात

अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक महिलांनी बचतगटांची स्थापना केली आहे, परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचतगटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचतगट आर्थिक संकटात सापडले आहेत.

शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित

अंबाजोगाई : तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती, परंतु मध्यंतरी उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.

तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वादविवाद उद्‌भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोजवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते, परंतु प्रत्यक्ष कामाकडे या समिती सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.