शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू असतानाच काम झालेल्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडत होत्या, तर पूल असलेल्या ठिकाणी मोठमोठे जम्प झाल्याने वाहने आदळत आहेत. जागोजागी खड्डे दिसू लागल्याने या नवीन रस्त्यावर आता अपघातास निमंत्रण मिळणार आहे.

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली होती. या महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव व माजलगाव ते परतूर या ५०-५० किलोमीटरच्या अंतरासाठी वेगवेगळ्या कंपनीला टेंडर देण्यात आले होते. माजलगाव ते केज हे काम घेणाऱ्या कंपनीने हे काम ओबडधोबड करत दीड वर्षाच्या आत उरकून घेतले होते. या कंपनीने तर माजलगाव शहरातील रस्त्याची पूर्णपणे वाट लावत अत्यंत नित्कृष्ट दर्जाच्या नाल्या व रस्ता केल्याचा आरोप नागरिकांनी वारंवार केला होता; परंतु संबंधित कंपनीने कोणाचेही न ऐकता काही राजकीय मंडळीना हाताशी धरून रस्त्याची कामे उरकून घेतली होती. या रस्त्याचे काम पुढे चालू असताना आधी केलेल्या रस्त्याला भेगा पडत होत्या. संबंधित कंपनीने भेगा पडलेल्या ठिकाणी रस्ता फोडून तो दुरुस्त करण्याऐवजी त्यात डांबर व वाळू भरल्याने जागोजागी जम्प झाले आहेत, तर ज्या ठिकाणी पूल करण्यात आला आहे, त्या ठिकाणी रस्ता खाली-वर झाल्याने वेगाने जाणारी वाहने आदळत आहेत.

माजलगाव -केज रस्त्याबरोबरच माजलगाव-परतूर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन साडेतीन- चार वर्षे झाली. याचा दर्जादेखील अतिशय नित्कृष्ट होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला होता, तर हा रस्ता सुरू असताना पाठीमागे झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगादेखील पडलेल्या आहेत.

माजलगाव शहरापासून दोन्ही बाजूला झालेल्या व चालू असलेल्या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट असताना एकही राजकीय, सामाजिक नेते-कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत.

केंद्र सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाला ५० वर्ष काहीच होणार नाही, असे एकीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सांगत आहेत; परंतु खामगाव-पंढरपूर या वारी मार्गाला पाच वर्षांच्या आतच तडे जाऊन खड्डे पडू लागले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

===Photopath===

290521\img_20210527_133346_14.jpg~290521\img_20210527_132229_14.jpg