धावत्या टेम्पोतून कीटकनाशक लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:21+5:302021-08-22T04:36:21+5:30

.... बीड शहरात लाइनमनला मारहाण बीड : फ्युज का टाकली नाही, असे म्हणत एकाने महावितरणच्या लाइनमनला लाथाबुक्क्या व फायटरने ...

Pesticide lamps from the running tempo | धावत्या टेम्पोतून कीटकनाशक लंपास

धावत्या टेम्पोतून कीटकनाशक लंपास

....

बीड शहरात लाइनमनला मारहाण

बीड : फ्युज का टाकली नाही, असे म्हणत एकाने महावितरणच्या लाइनमनला लाथाबुक्क्या व फायटरने मारहाण केली. ही घटना शहरातील गांधीनगर भागात २० ऑगस्ट रोजी घडली. यावरून एकावर गुन्हा नोंद झाला.

रजीम अजमतुल्ला शेख (३०, रा. बालेपीर) असे जखमीचे नाव आहे. ते महावितरणमध्ये लाइनमन आहेत.

गांधीनगर येथील तौफिक बागवान याने सोनवणे डीपीचा फ्युज टाकण्यासाठी मंगळवारी रात्री पावणेआठ वाजता लाइनमन शेख यांना कॉल केला होता. त्यावरून महावितरणचा तो कर्मचारी फ्युज टाकण्यासाठी गेला होता. मात्र, तुला किती वेळापासून मी फोन करतो आहे. फ्युज का टाकली नाही, असे म्हणत तौफिक बागवान याने रजीम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नोकरी घालवण्याची धमकी देत त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी रजीम यांच्या तक्रारीवरून तौफिक बागवान याच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

....

Web Title: Pesticide lamps from the running tempo