शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रडत बसण्यापेक्षा समूह शेतीतून साधला प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : गेल्यावर्षी लाॅकडाऊनच्या तडाख्यात सापडून खर्चदेखील हाती लागला नसला तरी यावर्षी पुन्हा नव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : गेल्यावर्षी लाॅकडाऊनच्या तडाख्यात सापडून खर्चदेखील हाती लागला नसला तरी यावर्षी पुन्हा नव्या जोमाने तितकीच मेहनत करून झालेली तूट गोमळवाड्यातील शिक्षण क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भागवत गर्जे यांनी भरून काढली. शिकला सवरला शेतकरी शिक्षण क्षेत्रात काम तर करतोच परंतु इच्छुक शेतकऱ्यांनादेखील शेतात मार्गदर्शन करून आपल्या बरोबर इतरांनाही अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र सांगत आहे. सलग सहा वर्षांपासून खरबुज, टरबुज, काकडी, ढोबळी मिरची असे नवे-नवे सुधारित वाण निवडून वेळीच लागवड करून कमी मजुरी आणि अल्पावधीत लाखांवर उत्पादन गर्जे हे घेत आहेत. शेतकऱ्यांचा समूह करून सर्वांना लागवड, विक्रीपर्यंत भागवत गर्जे मार्गदर्शन करत असल्याने त्याचा फायदा विशेष तरूण उमदे शेतकरी घेत आहेत.

जानेवारीत खरबुजाची लागवड

भागवत गर्जे यांनी ज्ञानेश्वर बडे, अशोक जायभाये, प्रदीप जायभाये असा शेतकऱ्यांचा ग्रुप करून प्रत्येकाने एकर, सव्वा एकर क्षेत्रावर १५ जानेवारी रोजी खरबुज लागवड केली. मल्चिंग, सौरऊर्जा, ठिबक असे तंत्र वापरून खरबुज वेली जोमदार आणल्या, त्यांनी ६,५०० बियाण्यांची लागवड केली. आतापर्यंत एकरभर क्षेत्राला सर्व खर्च ५० ते ६० हजार रुपये झाला असला, तरी उत्पादन चांगले मिळणार असल्याचे सांगितले.

तूट भरून काढली, आता पुढचा नफा

लागवडीनंतर ७० दिवसांनी फळतोडीला सुरूवात झाली. आतापर्यंत जवळपास पाच टन मालाची नाशिक, बीडच्या बाजारात विक्री केली. आणखी किमान ७ ते ८ टन माल निघेल. प्रति किलोला साधारण १७ ते १८ रूपये ठोक भाव मिळाला असून खर्च व मागील वर्षीची तूट भरून निघाली. आता यापुढचा माल हा निव्वळ नफा राहील, असे गर्जे यांनी सांगितले.

प्रयोग फायदेशीर ठरला

सुधारित व सामूहिक शेती केल्यास नक्कीच फायदा होतो. हा अनुभव असल्याने इतरांनाही प्रवृत्त करतो व त्याचा फायदादेखील त्यांना मिळतो. शेती करताना नैराश्य भाव नसलाच पाहिजे. फक्त अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे असल्याचे भागवत गर्जे यांनी सांगितले.

भागवत गर्जे यांच्यामुळे आम्हीदेखील खरबुज शेतीचा प्रयोग केला आणि तो चांगलाच फायदेशीर ठरल्याचे ज्ञानेश्वर बडे, अशोक जायभाये व प्रदीप जायभाये यांनी सांगितले.

===Photopath===

110421\11bed_4_11042021_14.jpg~110421\11bed_3_11042021_14.jpg~110421\11bed_2_11042021_14.jpg