शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

रामनामाच्या गजरात राजेवाडीमध्ये शोभायात्रा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होत ग्रामस्थ रामनामात तल्लीन ...

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होत ग्रामस्थ रामनामात तल्लीन झाले.

तालुक्यात दिनांक १५ जानेवारीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. रविवारी गावातीलच श्रीराम मंदिराचे संस्थापक बाळकृष्ण महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने राजेवाडी येथील ग्रामस्थांनी शोभायात्रा काढली. उपसरपंच रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद, महादेव थेटे, केशव कदम, मधुकर कदम, नामदेव महाराज मुळे, संजय पाठक, आश्रुबा नांदे महाराज यांच्या प्रयत्नातून या शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेमध्ये भगव्या पताका, प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमासह गावातील भजनी मंडळी, महिला मंडळी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक व तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला होता. कलशधारी चिमुकल्या विद्यार्थिनींनी या शोभायात्रेची रंगत वाढवली होती. ढोल, ताशा, वाजंत्रीसह तल्लीन झालेल्या तरुणांनी केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले. जागोजागी शोभायात्रेतील प्रभू रामचंद्र मूर्ती व प्रतिमेचे औक्षण करून पूजन करण्यात येत होते. शोभायात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रा. डॉ. उमेश साडेगावकर यांनी समाधान व्यक्त केले. दीपक महागोविंद यांनी आभार मानले. यावेळी निधी संकलन अभियानाचे नित्रुड मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देशमुख यांच्यासह समस्त राजेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.