पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:54 IST2025-10-26T18:52:05+5:302025-10-26T18:54:28+5:30
Pankaja Munde Manoj Jarange Patil: दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांनी समाजातील सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रस्ताव दिला.

पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
Pankaja Munde Manoj Jarange latest News: "मी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. जरांगे पाटलांनी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून त्यांना भेट द्यायला तयार आहे. मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही", असे म्हणत कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मैत्रीचा प्रस्ताव दिला.
परळी येथे दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी लोकसभेतील पराभव, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरही भूमिका स्पष्ट केली.
मला कोणाचाही राग आलेला नाही
पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या की, "ज्यांनी माझं वाईट चितले नाही, ते सर्वजण व्यासपीठावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले गेले. मी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर त्यावेळी ठाम होते. मला कोणाचाही राग नाहीये. मी पराभूत झाले म्हणून काहींनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला थोडक्यात हरले, पण एकमेव विधान परिषदेची आमदार आहे, जी मंत्रिमंडळात आहे."
पंकजा मुंडे मनोज जरांगेंना काय म्हणाल्या?
"आता नव्या उमेदीने काम करा. मी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. प्रत्येकाला एससी, एसटी व्हायचे आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण केले, तर पालकमंत्री म्हणून भेट द्यायला मी तयार आहे. एससी, एसटीचे आरक्षण केंद्र सरकार देते. मी जरांगेंना सांग इच्छिते की, आपल्या समाजांमधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व होते, तेच माझेही व्यक्तिमत्व आहे. मी कायद्याच्या चौकटीबाहेर जाणार नाही. माझ्या जातीचा असला, तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा नाही", असा प्रस्ताव पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे यांना दिला.
काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही
"मी दररोज ४०० लोकांना भेटते. मी तुमच्या फक्त सुखात नाही, तर दुःखातही सोबत आहे. संघर्षात सोबत आहे. निवडणुकीत वज्रमूठ करा. अजित पवार यांच्याबरोबर युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. जास्त डोक लावू नका, फक्त काम करा. इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी माझ्याकडे येऊ नका", असे सांगत पंकजा मुंडेंनी स्वबळाची तयारी करण्याचे निर्देश दिले.