शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली. ...
तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे. ...
तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला. ...
अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केल्याची घटना ३ जुन रोजी घडली होती. या आरोपीला गुरूवारी पहाटे लोणावळा येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ...
माझ्या मंत्रालयात ओळखी असून त्याआधारे तुम्हाला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करत रायगड जिल्ह्यातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आष्टीच्या तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...