कोळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:13 AM2019-08-14T00:13:33+5:302019-08-14T00:14:12+5:30

तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Thieves smoke in coal tar; Five houses were demolished | कोळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच घरे फोडली

कोळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच घरे फोडली

Next
ठळक मुद्देनागरिकांत दहशत : फिल्मी स्टाईल पाठलाग; चार तासांत पोलिसांनी केले चोरट्यांना जेरबंद; गस्तीची मागणी

गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून सोने दागिन्यांसह ६० ते ७० हजारांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने कोळगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी गावातील पाच घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अविनाश गवळी, सिंधूबाई काशिद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी घरात राहणाऱ्या नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने त्यांनी याठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मदनराव घाडगे यांच्या घराचे पाठीमागून गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कपाट फोडून दागदागिन्याची पेटी फोडताना आवाज झाल्यामुळे त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या, कोण आहे? कोण म्हणत मोठा आवाज होत असल्याने चाकूचा धाक दाखवून धूम ठोकली. त्यानंतर मोबाईलच्या संपर्काने मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी वाढली. तसेच अविनाश लोंढे यांच्या ही घरात घुसून कपाट, पेटी, डबे यांची मोडतोड करून काही चांदीची नाणे, रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरांनी कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत असलेल्या उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दरम्यान उध्दव करांडे यांच्यासह घरातील अन्य सदस्य झोपलेल्या दोन खोलीला बाहेरु न लॉक करु न चोरट्यांनी स्वयंपाक घरात असलेल्या पेटी, डब्यातील २ तोळे सोने, २० हजारांची रक्कम असा एकूण ८० हजारांचा माल घेऊन चोर पळून गेले. हा प्रकार उध्दव करांडे यांच्या लक्षात पहाटे उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तसेच रु मचे दरवाजे बाहेरून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव करांडे यांनी आरडाओरडा केली. शेजाऱ्यांनी असणाºया लोकांनी धाव घेऊन हा घडलेला प्रकार लक्षात आला. या चोरीच्या घटनेमुळे कोळगावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना झाल्या नंतर पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सिरसाट, नागरे यांनी भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. परंतु चोरांचा ठोस शोध मात्र लागला नाही.

Web Title: Thieves smoke in coal tar; Five houses were demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.