Beed's 'IMA' provides over 4.5 million medicines to flood sufferers | बीडच्या ‘आयएमए’कडून पुरग्रस्तांना साडेचार लाखांचे औषधे
बीडच्या ‘आयएमए’कडून पुरग्रस्तांना साडेचार लाखांचे औषधे

बीड : कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना मदत म्हणून बीडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने साडेचार लाख रूपयांचे औषधे दिले आहेत. आज सकाळीच औषधांनी भरलेले वाहन कोल्हापूरला रवाना झाला आहे. 

सांगली, कोल्हापूर येथे पुर आल्यानंतर बीड जिल्ह्यातून साहित्य, धान्य व इतर साहित्याच्या माध्यमातून मदत करण्यात आली. यासाठी हजारो दानशुर हात पुढे सरसावले होते. हाच धागा पकडून बीडच्या आयएमए संघटनेनेही पुढाकार घेतला. कोल्हापूर आयएमएकडून औषधांची मागणी होताच बीडची संघटना एकत्र आली आणि अवघ्या काही तासांत साडेचार लाख रूपयांचे औषधी जमा केले. जिवनावश्यक औषधांनी भरलेले वाहन मंगळवारी सकाळीच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे. ही मदत कोल्हापूर आएएमएकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ.अनिल बारकुल यांनी सांगितले. दरम्यान यातील ५१ हजार रूपयांची आर्थिक मदत ही राज्य आयएमएकडे पाठविण्यात आली आहे. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, आयएमए बीडचे अध्यक्ष डॉ.अनिल बारकुल, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.विनोद ओस्तवाल, डॉ.सी.ए.गायकवाड, डॉ.अविनाश देशपांडे, डॉ.सुशांत योगे, डॉ.राजेश शिंदे, डॉ.अनंत मुळे, डॉ.सुनिता बारकुल, डॉ.डिंपल ओस्तवाल, डॉ.जयश्री घुगे, डॉ.रिता शहाणे, डॉ.प्रज्ञा तांबडे आदींची यावेळी उपस्थिती होती.


Web Title: Beed's 'IMA' provides over 4.5 million medicines to flood sufferers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.