शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
3
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
4
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
5
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
7
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
8
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
9
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
10
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
11
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
12
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
13
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
14
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
15
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
16
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
17
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
18
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
19
सांगली हादरली! किरकोळ वादातून पतीने डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या; मुलाला मित्राकडे सोडून पती फरार
20
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आईला मारहाण केल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत सतत मारहाण करणार्‍या पित्यावर मुलानेच कोयत्याने सपासप वार करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत सतत मारहाण करणार्‍या पित्यावर मुलानेच कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील शेतात सोमवारी (दि. २४) रात्री घडली. पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.

श्रीकिसन अंबादास तागड (वय ६०, रा.पिंपळनेर, ता.बीड) असे मयताचे नाव आहे. श्रीकिसन हा दारू पिऊन सतत आईशी घरी वाद घालायचा. तिला शिवीगाळ करायचा. या रागातून मुलगा लहू श्रीकिसन तागड याने सोमवारी रात्री शेतात वडील एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करीत खून केला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, सुरवसे, वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

आरोपी मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पिंपळनेर पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

बैलाने मारल्याचा केला होता बनाव

वडिलांच्या सतत त्रास देण्याच्या रागातून मुलगा लहू याने सोमवारी रात्री खून केला. घरच्यांना ही माहिती मिळाल्यानंतर घटना लपवण्यासाठी रात्रीच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विरोध झाल्याने जिल्हा रुग्णालयात बैलाने मारल्याचा बनाव करून दाखल करण्यात आले. मृत्यू संशयास्पद असल्याने याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भुतेकर यांना देण्यात आली. त्यांनी जिल्हा रुग्णालयात येत मृतदेहाची पाहणी केली असता हा खून असल्याचे आढळून आले. विचारपूस केली तर रागाच्या भरात खून केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

===Photopath===

250521\25_2_bed_14_25052021_14.jpeg

===Caption===

पिपळनेर येथील शेतात खून झालेल्या ठिकाणी पाहणी करताना पिंपळनेर पोलसी अधिकारी कर्मचारी