केज- धारूर रोडवर दुचाकी अपघातात एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:46 IST2018-12-15T18:45:57+5:302018-12-15T18:46:40+5:30
वाजेद जीलानी आत्तार (२०) हे शुक्रवारी रात्री दोघा साथीदारांसह केजकडे येत होते.

केज- धारूर रोडवर दुचाकी अपघातात एकजण ठार
केज (बीड ) : धारूर येथून शुक्रवारी रात्री दुचाकीवर येणाऱ्या व्यापाऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यात एकजण ठार झाला असून दोघे जखमी आहेत.
धारूर येथील मसाल्याचे व्यापारी वाजेद जीलानी आत्तार (२०) हे शुक्रवारी रात्री दोघा साथीदारांसह केजकडे येत होते. भवानी माळावर आले असता उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. यात तिघेही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर १०८ ला कॉल केल्यानंतर डॉ.नंदकुमार गोरे व पायलट अर्जुन बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वाजेद हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात दाखल्र करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले.