One died on the spot in a tanker and tempo accident | टँकर आणि टेम्पो अपघातात एकजण जागीच ठार 

टँकर आणि टेम्पो अपघातात एकजण जागीच ठार 

कडा : धानोरा येथील बीड-कडा-नगर रोडवरील वळणावर मंगळवारी दुपारी टँकर व मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात मालवाहू टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. अनिस जमाल शेख (४० ) असे मृत चालकाचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील अनिस शेख हा मालवाहू टेम्पोमधून ( MH23, Au 2670 ) नगरच्या दिशेने जात होता. दरम्यान, नगरवरून आष्टी कडे येत असलेला टँकरसोबत ( MH.16, G. 5900 ) त्यांची समोरासमोर धडक झाली. यात चालक अनिस शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: One died on the spot in a tanker and tempo accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.