सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:05 IST2022-05-10T17:04:22+5:302022-05-10T17:05:59+5:30
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकवरील दोघा सख्ख्या भावांना उडवले

सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
धारूर (बीड ): दुचाकीवरुन जात असलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळ ओढावल्याची घटना आज दुपारी तालुक्यातील तेलगाव येथे घडली. एका ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत बाईकवरील दोघे भाऊ खाली कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. आदित्य शंकर राठोड असे मृताचे नाव आहे.
बाबीतांडा येथून आदित्य व अभिजित शंकर राठोड हे सख्खे भाऊ बाईकवरुन तेलगावकडे जात होते. तेलगाव जवळील एका पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या बाईकला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात आदित्यचा ( 20) जागीच मृत्यू झाला तर अभिजित ( 22) गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.