शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बीडमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी; आरोग्य विभागालाच नियमांचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 2:20 PM

Corona Vaccination इतरांना कोरोना नियम सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले आहेतमराठवाड्यात रविवारी ५८७ कोरोना बाधितांची भर पडली

बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांची तुफान गर्दी झाल्याचे दिसले. आरोग्य प्रशासनाचे येथे कसलेही नियोजन नव्हते. सोशल डिस्ट्न्स, मास्क, सॅनिटायझर आदी येथे दिसले नाही. इतरांना कोरोना नियम सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसले. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती दिली. 

दरम्यान, बीड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले असून, २७ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४१६ एवढी झाली आहे. १७ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले, तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात ५८७ बाधितांची भरमराठवाड्यात रविवारी ५८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल २०१ आणि जालना जिल्ह्यात १६८ बाधितांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी तब्बल २०१ बाधित रुग्ण आढळले. आता बाधितांची एकूण संख्या ४८ हजार ६३८ झाली असून १२५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात रविवारी ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता एकूण रुग्णसंख्या आता २३ हजार १४९ झाली. ५९२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात रविवारी १६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण बाधितांची संख्या १४ हजार ६०० एवढी झाली आहे. आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९०७ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी २१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ८ हजार २६८ एकूण रुग्णसंख्या झाली असून, ७ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात दुपारपर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ हजार १५४ इतकी नोंद झाली. यातील ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १६ हजार ४५४ रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत. सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर बीड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड