शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांसाठी एनडीएलआय म्हणजे माहितीचा खजाना : राहुल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST

बीड : नॅशनल डिजिटल लायब्ररीचा वापर करून प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आपल्या घरी बसून, मोबाइलच्या साहाय्याने साहित्य, सामाजिक शास्त्रे, ...

बीड : नॅशनल डिजिटल लायब्ररीचा वापर करून प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आपल्या घरी बसून, मोबाइलच्या साहाय्याने साहित्य, सामाजिक शास्त्रे, भाषा, संस्कृती व अन्य माहिती सहज प्राप्त करू शकतो. एनडीएलआय म्हणजे आपल्या सर्वांसाठी माहितीचा खजाना आहे, अशी माहिती आर.जी. शिंदे महाविद्यालय, परांडा येथील ग्रंथपाल डॉ. राहुल देशमुख यांनी दिली.

दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी वर्ष व ग्रंथपाल दिन यांचे औचित्य साधून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वा. सावरकर महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युजर अवेअरनेस ऑन नॅशनल डिजिटल लायब्ररी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये डॉ. देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, १९ जून २०१८ रोजी भारतात एनडीएलआयची सुरुवात झाली. दोनशेपेक्षा अधिक भाषांमधील लाखो विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच नीट, जेईई, तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. एनडीएलआयच्या वापराने डिजिटल एज्युकेशनला गती मिळाली आहे. सर्वांनी या प्लॉटफॉर्मवर जाऊन आपली नोंदणी करावी व याचा जास्तीत वापर करावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलूकर म्हणाले की, एनडीएलआय म्हणजे माहितीचा समुद्र आहे. यातून ज्याला जी माहिती पाहिजे आहे ती माहिती मिळू शकते. प्रत्येकाचा ज्ञानात वृद्धी होत आहे. सर्व शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्या हातातील मोबाइलचा वापर करून डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती आपला मिळवून अध्ययन / अध्यापन प्रक्रिया जास्त गतिमान करण्यासाठी एनडीएल कसे महत्त्वाचे आहे यासाठी आजच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारला भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, सहकार्यवाह डॉ. कल्पना चौसाळकर, सहकार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सावरकर संकुलाचे अध्यक्ष गजानन जगताप, कार्यवाह डॉ. विवेक पालवणकर, शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सिद्धेश्वर संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, प्राचार्य महेश देशमुख, प्राचार्य मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, ग्रंथपाल प्रा. सुरेश बन्सोडे, ग्रंथपाल प्रा. तुळशीराम मुंडे, तिन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावरकर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल तथा वेबिनारच्या संयोजिका डॉ. अनुजा कास्तीकर यांनी केले. आभार डॉ. विनायक देशमुख यांनी मानले.