धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:23+5:302021-07-07T04:41:23+5:30

धारूर : गॅस, डिझेल, पेट्रोल व खाद्यतेलाच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी येथे आंदोलन केले. आंदोलनात तालुक्यातील ...

NCP protests against fuel price hike in Dharur - A | धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने - A

धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने - A

धारूर : गॅस, डिझेल, पेट्रोल व खाद्यतेलाच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी येथे आंदोलन केले. आंदोलनात तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करून निदर्शने केली.

धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार वंदना शिडोळकर यांना आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, ओबीसी सेलचे राज्य प्रमुख ईश्वर मुंडे, गटनेते सुधीर शिनगारे, हनुमंत नागरगोजे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब तिडके, अमोल जगताप, सजित कोमटवार, सय्यद शाकेर, नितीन शिनगारे, परमेश्वर तिडके, परमेश्वर राऊत, श्याम थोरात, ज्ञानेश्वर होरमाळे, मदन धोतरे, अनंत फावडे, गणेश सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश थोरात, विश्वास शिनगारे, पप्पू कुंभार, हनुमंत अंधारे रणजित रूपनर, दीपक लगड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

050721\14051444-img-20210705-wa0037.jpg

धारूर तहसील समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन वाढी साठी निदर्शने

Web Title: NCP protests against fuel price hike in Dharur - A