शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांंच्या तोंडाला मास्क नावालाच; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

रियालिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अनलॉकनंतर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास सर्वच आगाराच्या एस. टी. बसेस सुरू ...

रियालिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : अनलॉकनंतर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास सर्वच आगाराच्या एस. टी. बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु, बसमधून प्रवास करताना मास्क मात्र नावालाच. सोशल डिस्टन्सिंग तर कुणीच पाळत नाही. एकाकडेही सॅनिटायझर नाही. चालक, वाहकही एकदा बसस्थानक सोडले की मास्क काढून टाकत आहेत. एकंदरीत आता कोरोना संपला.. बिनधास्त फिरा... असेच चित्र बस प्रवास करताना आढळून आले.

‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी (दि. २३ जून) दुपारी जामखेड-बीड असा एस. टी.चा दोन तास प्रवास करीत रियालिटी चेक केले. कोरोनामुळे जवळपास दोन महिने एस. टी. चाक थांबले होते. अनलॉकनंतर एसटी सुरू झाल्या. परंतु, बस सुरू करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे सर्वांना सक्तीचे केले आहे. परंतु, बसमधून प्रवास करताना ना मास्क, ना सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा कसलाच वापर होत नाही. बिनधास्तपणे लोक प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.

...

‘लोकमत’एस.टी.चा प्रवास

जामखेड-बीड

वेळ बुधवारी दुपारी ११.४० वाजता जामखेड बसस्थानकावर पुणे-माजलगाव बस आली.

या बसमध्ये १५ प्रवासी होते. बस चालकाच्या तोंडाला मास्क होता. वाहकाच्या तोंडाला मास्कऐवजी पांढरा पंचा गुंडाळलेला होता. बसमध्ये प्रवाशांकडून चढताना, उतरताना कसलेली सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. बसमध्ये मात्र प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसले होते. कोणी तोंडाला मास्क, कोणी पंचा, कोणी रुमाल बांधला होता. महिलांनी मास्कऐवजी पदराने तोंड झाकले होते. सॅनिटायझरचा मात्र कोणाकडेच पत्ता नव्हता. जामखेड बसस्थानकातून बस ११.५० वाजता सुटली. बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते. दहा मिनिटांत बस जामखेड शहराबाहेर निघाली. यानंतर मोकळी हवा घेण्यासाठी सर्वांनी मास्क खाली केले. काहींनी काढून ठेवले. ते बीडला येईपर्यंत. येथे उतरताना मात्र सर्वांना पुन्हा मास्क लावले. यात चालक, वाहकही मागे नव्हते.

.....

प्रवाशांची चढउतार

११.४० - जामखेड बसस्थानकावर पाच प्रवासी उतरले. दोन प्रवासी चढले. सर्वांच्या तोंडावर मास्क होते.

१२.१५ - साैताडा, वांजरा फाटा - एकाही प्रवाशांची चढ उतार नाही.

१२.३५ - रोहोतवाडी - एक प्रवासी उतरला.

१.०० - लिंबादेवी - एक प्रवासी चढला. तोंडावर मास्क आढळून आला.

१.१४ - चऱ्हाटा येथे १ प्रवासी चढला. तोंडावर पंचा बांधलेला होता.

१.२० मिनिटांनी बीड बसस्थानकावर जवळपास सर्वच प्रवासी उतरले. सर्वांनी उतरताना मास्क लावले.

...

चालक - बस चालकाच्या तोंडावर जामखेड स्थानकातून बस सुटल्यानंतर १५ मिनिटे मास्क लावलेला होता. त्यानंतर बीड शहराजवळ बस असल्यानंतरच मास्क लावला.

...

वाहक - तिकीट बुकिंग करेपर्यंत तोंडाला पंचा गुंडाळला होता. त्यानंतर १० मिनिटेच तोंड बांधलेले होते. यानंतर मात्र बीड जवळ आल्यानंतरच पुन्हा पंचा तोंडाला गुंडाळला.

...

प्रवासी - जामखेडपासून बीडपर्यंत जवळपास सर्वच प्रवाशांच्या तोंडाला मास्क, पंचा, रूमाल होते. बस सुटताच सर्वांनी बाजूला केेले होते. बीड शहरात प्रवेश करताच पु्न्हा तोंडावर मास्क लावले. यात तीन महिला प्रवास करीत होत्या. त्यांच्याकडे मास्क नव्हता. त्या पदरानेच तोंड झाकत होत्या.

...